१५ दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर कसे करताहेत आंदोलन! हृदय पिळवटून टाकणारी एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा

मागील पंधरा दिवसांपेक्षा जास्त राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत, संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे सहकुटुंब, सहपरिवार एसटी कर्मचारी हे आले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी ठाण मांडून बसले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून अत्यंत हालाखीचे दिवस येथील कर्मचारी काढत आहेत. पंधरा दिवसापासून येथील कर्मचारी काय खात आहेत? पीत आहेत? यांच्या जेवणाची व्यवस्था कशी केली जाते? अशा विविध समस्या नवराष्ट्रने जाणून घेतल्या आहेत

  मुंबई : मागील पंधरा दिवसांपेक्षा जास्त राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत, संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे सहकुटुंब, सहपरिवार एसटी कर्मचारी हे आले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी ठाण मांडून बसले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून अत्यंत हालाखीचे दिवस येथील कर्मचारी काढत आहेत. पंधरा दिवसापासून येथील कर्मचारी काय खात आहेत? पीत आहेत? यांच्या जेवणाची व्यवस्था कशी केली जाते? अशा विविध समस्या नवराष्ट्रने जाणून घेतल्या आहेत. त्याचा हा आढावा

  १५ दिवसांपासून आंदोलन

  राज्यात मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यभरातून चालक, वाहक, महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळं या आंदोलनात या कर्मचाऱ्यांचे अत्यंत हालाखीचे दिवस जात आहेत. राहणे, भूक, आंघोळी, खाणेपिणे, जेवण आदी गोष्टीच्या समस्य़ा आहेत. पुरुषांचे एकवेळ कसे तरी राहू शकतो, पण महिलांना हालत खूप वाईट होत आहे, यातच काही महिला आजारी सुद्धा पडल्या आहेत. त्यामुळं इथलं सध्या वातावरण खूप गंभीर आणि मन हेलावून टाकणारं आहे.

  कमी पगारात घर चालवणे अवघड

  या आंदोलनात राज्यभरातून कर्मचारी सहभागी झाले आहेत “आजरा, कोल्हापूर येथून दतात्रय अस्वले हे मागील वीस वर्षापासून एसटीत काम करत आहेत, यांना सध्या २० हजार पगार आहे, आणि यांच्या हातात १२ हजार पगार येत आहे, त्यामुळं घर चालविणे अवघड झाले आहे, असं अस्वले यांनी सांगितले आहे” तर “एकनाथ सुळे हे अकलूज, सोलापूर या एसटी डेपोट मागील १५ वर्षापासून काम करत आहेत, तर त्यांना फक्त २० हजार रुपये पगार आहे. या पगारात खायचं काय? आणि घर कसे चालवायचे असा प्रश्न यांना पडला आहे, त्यामुळं आमच्या मागण्या सरकारनं मान्य करुन विलिनीकरण करावे असं सुळे यांनी म्हटले आहे” तर या आंदोलनात महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. अक्कलकोट येथून कुंभार या महिला कर्मचारी सहभागी झाल्या आहेत. “मी मागील १२ वर्षापासून एसटीत काम करत आहे, पगार फक्त १२ हजार आहे, या पगारात घर चालत नाही, येथे आम्हाला गावाकडून भाकरी, जेवण येत आहेत ते आम्ही खात आहे, आणि आंदोलन करत आहे, असं एसटी महिला कर्मचारी कुंभार मॅडम यांनी म्हटलं आहे”

  मैदानावरच कर्मचाऱ्यांची झोप

  या आंदोलनात हजारो महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत, यातील कर्मचारी याच आझाद मैदानावर झोपतात, तर अनेकांनी आंघोळीची सोय नाही आहे, झोपायची कुठेही सोय नसल्यामुळं हे कर्मचारी याच मैदानावर झोपतात. अनेकांनी गावावरुन आपले कुटुंब बरोबर आणले आहे, ते सुद्धा याच मैदानावर रात्र दिवस राहत आहे. दुसरे कुठे राहयची सोय नसल्याने ते मैदानावरच राहत आहेत.

  उपासमारी आणि शिळे जेवण

  १५ दिवसांपासून हे कर्मचार आंदोलन करत असल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुंबईत नाहीत, त्यामुळं कर्मचाऱ्यांना गावावरुन भाकरी किंवा जेवण येत आहे, किंवा काही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ह्या कधी-कधी जेवण वाटप करतात, पण ज्या दिवशी जेवण नसते, त्या दिवशी कर्मचारी यांना उपासमारीला सामोरी जावे लागते. त्यामुळं अनेक महिला आणि पुरुष आजारी पडले आहेत. काहीं सर्वंच गावावरुन आल्यामुळं गावावरुन जेवणाची आशा पण मावळली आहे.

  कर्मचाऱ्यांनी सरकारला आर्त हाक

  राज्यात मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यभरातून चालक, वाहक, महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी करुन घेतले आहे. लहान मुलं, महिला, पुरुष घरातील कर्ता पुरुष सगळेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळं सगळ्यांचीच उपासमार होत आहे, १५ दिवसांपासून खूप हालाखीत आणि वाईट परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी दिवस काढले आहेत, त्यामुळं सरकार मायबापने अधिक आमचा अंत न पाहता, आमची मागणी मान्य करुन, विलिनिकरण करावे अशी आर्त हाक इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. हे कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून मन हेलावून जाते, हद्य पिटवळून जाते, आणि वाटते या कर्मचाऱ्यांचे सरकारनं म्हणणे ऐकून यातून लवकर तोडगा काढावा असे म्हणावेसे वाटते.