गुलाब चक्रीवादळामुळं राज्यात मुसळधार पाऊस पडणार – हवामान विभाग

    मुंबई : शनिवारी तयार झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ हे आज पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. आणि हे ‘गुलाब’ चक्रीवादळ आज मध्यरात्री उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळं पूर्व किनारपट्टी येथे विजेंच्या कडकडटांसह आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या गुलाब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राला जाणवणार असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे.

    वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये ७ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    २७ तारखेला म्हणजे सोमवारी विदर्भ आणि मराठवाडा येथे तर, २८ तारखेला म्हणजे मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे जोरदार सुसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावे अशा इशारा प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई येथून शुभांगी भुते यांनी दिला आहे.

    गेल्या सहा तासांमध्ये ७ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.