गृहमंत्री अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल, सुशांत सिंगने आत्महत्या केली की खून झाला?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे होता. मात्र महाराष्ट्रासोबत बिहारमध्येही याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा एकत्रित तपास केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआय गेल्या पाच महिन्यांपासून सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र अद्याप सीबीआयला काहीच धागेदोरे मिळत नसल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केलेत.

अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात सीबीआय करत असलेल्या चौकशीबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही सवाल उपस्थित केलेत. सुशांत सिंगची आत्महत्या होती की त्याचा खून करण्यात आला, याबाबत सीबीआयकडे काही माहिती आहे का, असा सवाल त्यांनी विचारलाय.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे होता. मात्र महाराष्ट्रासोबत बिहारमध्येही याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा एकत्रित तपास केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआय गेल्या पाच महिन्यांपासून सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र अद्याप सीबीआयला काहीच धागेदोरे मिळत नसल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केलेत.

“सीबीआयकडे चौकशी जाऊन पाच महिने होऊन गेले. मात्र अद्याप सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्याचा खून झाला, हे सीबीआयने जाहीर केले नाही. सीबीआयने या बाबी लवकरात लवकर जाहीर करावा, अशी माझी विनंती आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच ईडीकडून नोटीस बजावण्यात आलीय. चौकशीला आपण स्वतः हजर राहू, असं खडसेंनी जाहीर केलंय. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्र्यांनी सीबीआयच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज्य विरुद्ध केंद्र या संघर्षाला त्यामुळे अधिक धार चढण्याची शक्यता वर्तवली जातेय.