I should not go to Kolhapur ... Kirit Somaiya's serious allegations against Home Minister and Sharad Pawar; Will report to the Human Rights Commission

भाजप नेते किरीट सोमय्या यानी ईडी कार्यालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी शरद पवार(sharad pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊ नये म्हणून मुंबईत स्थानबद्ध केले होते. एसीपी मिलिंद खेतले यांनी बोगस आदेश दाखवत थांबवले त्यावर आपण मानवी हक्क आयोगात तक्रार करणार आहोत.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यानी ईडी कार्यालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी शरद पवार(sharad pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊ नये म्हणून मुंबईत स्थानबद्ध केले होते. एसीपी मिलिंद खेतले यांनी बोगस आदेश दाखवत थांबवले त्यावर आपण मानवी हक्क आयोगात तक्रार करणार आहोत.

    सोमैय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ आणि कुटूंबिय तसेच त्यांचे जावई यांच्यामार्फत बेनामी कंपनीच्या माध्यमातून जे व्यवहार झालेत ते आता ईडीला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव कारखान्याची माहिती ईडीला दिली होती. आज आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याची माहिती ईडीला दिली आहे.

    ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना चालवायला दिला आहे. त्यातून बेनामी व्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना मान्यता नाही अशा शेल कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार झाला, असा दावा त्यांनी केला.