I was raised by Girish Mahajan as a competitor; Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते गिरीष महाजन यांच्यावर निशाणा साधला( I was raised by Girish Mahajan as a competitor; Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis ). 40 वर्षे मी भाजपा रूजवण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. इतक्या वर्षात महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत.

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते गिरीष महाजन यांच्यावर निशाणा साधला( I was raised by Girish Mahajan as a competitor; Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis ). 40 वर्षे मी भाजपा रूजवण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. इतक्या वर्षात महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत.

  इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणे मी करत होतो. मला स्पर्धक म्हणून महाजनांना मोठे केले जात आहे. आतापर्यंत महाजनांना मीच मदत करत आलो. सरपंच होते तेव्हा पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदतही मीच करत आलो. पक्षात खडसे मोठे होत आहेत. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठे केले, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागा शिवसेना, 2 जागा काँग्रेस आणि एक जागा भाजपाला मिळाली. या पार्श्वभूमीवर बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या 6 वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क वर्गात होती. आती ती अ वर्गात आली आहे. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला.

  शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित या निवडणुकीचा निकाल आहे. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला. अपयश येणार याची जाणीव त्यांना झाली होती. या निवडणुकीने जळगाव जिल्ह्यात आपली ताकद किती आहे हे दाखवून दिल्याचे खडसे यांनी आवर्जुन सांगितले.

  रोहिणी खडसे विजयी

  जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी यांनी एकतर्फी विजय मिळवला. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी यांनी व्यक्त केली. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.