university of mumbai Final year examinations of Distance and Open Learning Institute (Idol) from today

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल ) जुलै  २०२० या सत्रातील  ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे.  त्यानुसार या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना २९ डिसेंबर २०२० पर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येणार असल्याचे कळविण्यात  आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला वर्ष २०२०-२१ या जुलै सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता दिली. यानुसार आयडॉलमध्ये  जुलै सत्रात  आजपर्यंत ५६ हजार  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

यावर्षी प्रथमच आयडॉलने प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी हे पदवीस्तरावरील अभ्यासक्रम व  एमए /एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम  यावर्षीपासून सत्र पद्धतीमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टीम (CBCS ) मध्ये सुरू केले आहेत.

ही मुदतवाढ बीए, बी.कॉम, बीएस्सी आयटी, एमए (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,राज्यशास्त्र ), एमए (शिक्षणशास्त्र),  एम. कॉम, एमए /एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी भाग २ कॉम्प्युटर सायन्स  व व्यवस्थापनाचे दोन अभ्यासक्रम पीजी डीएफएम व पीजी डिओआरएम  या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. ‘जुलै सत्रासाठी ही अंतिम मुदतवाढ असून  विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा’ असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ.प्रकाश महानवर यांनी केले आहे.