amit shah

कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवाच, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे. तसेच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले(If anyone has the courage, stop the construction work of Ram temple; Amit Shah's challenge).

    दिल्ली : कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवाच, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे. तसेच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले(If anyone has the courage, stop the construction work of Ram temple; Amit Shah’s challenge).

    आज उत्तर प्रदेशात भाजपाच्या सरकारमुळे माफिया राज स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करीत आहेत. ज्या कुणाचा राम मंदिर उभारणीचे काम थांबवण्याचा इरादा आहे. त्यांना माझे सांगणे आहे की तुम्ही काम थांबवून दाखवाच. इतकी हिंमत कुणातच नाही. पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं पुनर्निमाण केले.

    बुआ बबुआ आणि काँग्रेस पक्षानं कधीच उत्तर प्रदेशचा विकास केला नाही. सपाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात फक्त गुंडगिरी आणि माफियाराजचा विकास झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान केला आहे, असे त्यांनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा