हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा – नवाब मलिक

दरम्यान आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना वरच्या सभागृहात चार विधेयके घेण्यात येणार आहे. भरती घोटाळा या राज्यात 2017 पासून सुरू झालेला आहेसं. पूर्ण भरती प्रक्रिया झाली त्या काळात आयटी काम पाहणारे कौस्तुभ हे ओएसडी म्हणून नेमण्यात आले. ओएसडी नेमून घोटाळे केले गेले.अध्यक्ष पदासाठी आमच्याकडे बहुमत आहे. काल ते म्हणत होते विवेकबुद्धीने मतदान व्हायला हवे ते म्हणतात पण लोकसभेत आणि राज्यसभेत ते होते का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मिडिया स्टॅण्ड येथे बोलताना लगावला आहे.

    दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा असेही नवाब मलिक म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे. विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

    दरम्यान आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना वरच्या सभागृहात चार विधेयके घेण्यात येणार आहे. भरती घोटाळा या राज्यात 2017 पासून सुरू झालेला आहेसं. पूर्ण भरती प्रक्रिया झाली त्या काळात आयटी काम पाहणारे कौस्तुभ हे ओएसडी म्हणून नेमण्यात आले. ओएसडी नेमून घोटाळे केले गेले.अध्यक्ष पदासाठी आमच्याकडे बहुमत आहे. काल ते म्हणत होते विवेकबुद्धीने मतदान व्हायला हवे ते म्हणतात पण लोकसभेत आणि राज्यसभेत ते होते का? हे म्हणतात सरकार घाबरते पण त्यांना माहीत की आता त्यांच्यासोबत किती जण आहेत

    पडळकर नितेश राणे यांच्यावर टीका

    ज्यांना मतदारसंघात कुणी विचारत नाही. जे निवडून येऊ शकत नाही त्यांना अजित पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही.भाजपने स्वतःला बोलता येत नाही म्हणून बोलण्यासाठी असे नेते नेमले आहेत. भाजपचे नेते धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.आदित्य ठाकरे धमकी प्रकरण ज्या पध्दतीने मंत्र्याना धमकी येते त्यामध्ये कुठली संघटना आहे याचा तपास आहे. ज्यांना यांचे विचार पटत नाही ते धमकी देत आहेत. हे लोक आता हतबल झाले आहेत. अशी मलिक यांनी भाजपवर टीका केली.