jitendra awhad

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी जर कालपासून चंद्रकांत पाटील यांच्या बापाचा कुठे उल्लेख केला असेल किंवा त्यांचा बाप काढला असेल असा एक जरी पुरावा किंवा एक जरी माध्यमाने बाईट दिला तर मी िधान भवनाच्या पायर्‍यांवर चंद्रकांत पाटील यांची नाक घासून माफी मागेन असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी िधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. दरम्यान तत्पूर्वी माध्यमांना सामोरे जाताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी काल जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केले तसेच कोणावर वैयक्तिक टीका करणे, किंवा बाप काढणे संसदीय भाषा नाही, नसल्याचे चंद्रकांत दादाने म्हटले. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना भान राखले पाहिजे, अशी आव्हाड यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

    दरम्यान या टीकेला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी जर कालपासून चंद्रकांत पाटील यांच्या बापाचा कुठे उल्लेख केला असेल किंवा त्यांचा बाप काढला असेल असा एक जरी पुरावा किंवा एक जरी माध्यमाने बाईट दिला तर मी िधान भवनाच्या पायर्‍यांवर चंद्रकांत पाटील यांची नाक घासून माफी मागेन असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र असा जर पुरावा सापडला नसेल तर किमान त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण तरी द्यावे अशी अपेक्षा आव्हाड यांनी केली महाराष्ट्राची जनता एवढी खुळी नाही आहे की जो कोणी काल बोलेल ते आज विसरेल त्यामुळे शाहू नगरीच्या मातीतील कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांनी मी त्यांचा बाप काढला असा जर पुरावा दिला तर मी त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागे असं असा पलटवार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

    त्यामुळे आता आव्हाडांच्या पलटवार आला किंवा प्रतिउत्तर आला चंद्रकांत पाटील कसे उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.