दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे – चित्रा वाघ

विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे - चित्रा वाघ

    मुंबई: अमरावती जिल्ह्यात गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दिपाली चव्हाण या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ निर्माण झाली आहे. दिपाली आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. यावर, दीपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे .

    चित्रा वाघ यांनी दोन ट्विट करत या प्रकरणी काही दावे केले आहेत. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न

    विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

    दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्या त्रासाचा पाढा वाचला आहे. जाणीवपूर्व कश्यापद्धतीने त्रास दिला जात होता याची सविस्तर माहिती त्यात दिली आहे.