मुख्यमंत्र्याचे ”ते” वक्तव्य काँग्रेसबाबत असल्याचे स्पष्ट झाले तर आमच्या पद्धतीने उत्तर देऊ : नाना पटोले

काँग्रेसने आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यानी शिवसेनेच्या वर्धापन दिनीनिमित्त बोलताना कुणाचेही नाव न घेता उत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, “स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजप पण करते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही.

    मुंबई : स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता पटोले यांनी बचावात्मक पवित्रा घेत मुख्यमंत्री ते वक्तव्य काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे सांगितले.

    मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही

    काँग्रेसने आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यानी शिवसेनेच्या वर्धापन दिनीनिमित्त बोलताना कुणाचेही नाव न घेता उत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, “स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजप पण करते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही.

    आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही

    आम्ही कोरोना काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. ते पक्षप्रमुख म्हणून बोलले. त्यामुळे ते असे बोलले असतील. जर हे काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. पटोले म्हणाले की, एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेण्यात गैर काय आहे.