शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे - आमदार प्रताप सरनाईक

  मुंबई: शिवसेनेचे ओवळा- माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा जून रोजी दोन पानी पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याची विनंती केली आहे. याच पत्रात त्यांनी शिवसेनेचे आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत करत असतील तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे असेही सरनाईक यांनी म्हटले आहे.

  अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतले तर बरे
  भाजप सोबत जुळवून घेतल्यास सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतले तर बरे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

  ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री’ शब्द पूर्ण करून दाखवला
  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे सरनाईक यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

  तिनही पक्ष भीक घालत नाही,
  या पत्राबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, सरनाईक यांच्या पत्रातून भाजपलाच, त्याचबरोबर तपास यंत्रणांनाही जोडे मारले आहेत. हे पत्र व्यवस्थित वाचले की समजते की, हा भाजपलाच डिवचण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि भाजपने पत्राची सविस्तर चौकशी करावी, भाजप नेते या पत्राबाबत काही भावना बाळगून असतील तर त्याला आघाडीतील तिनही पक्ष भीक घालत नाही, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
   
  पंकजा मुंडे कडून स्वागत
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना सरनाईकांच्या पत्राबाबत आपल्याला माहिती नाही. पण लिहिले असले तर स्वागत आहे. त्यांनी जे पत्र लिहिले आहे त्यावरुन सरकारच्या आजच्या परिस्थितीचा अंदाज येतो, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

  विरोधात लढलो, त्यांच्यासोबत बसणे योग्य नाही
  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रताप सरनाईक त्यांचे आमदार आहेत, नेते आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी विचार करावा. आमचे नेते केंद्रात आहेत. आम्ही त्यांना सांगू. बाकी आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो की, बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्यांच्याविरोधात लढण्यात गेली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून  बसणे योग्य नाही.