सत्ताधाऱ्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबविली असती तर, समुद्र किनारे स्वच्छ करण्याची वेळ आमच्यावर आली नसती – अमित ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने आज मनसेकडून राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती. तसेच पालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला.

  • If the authorities had implemented the system properly, the time would not have come for us to clean the beaches - Amit Thackeray

मुंबई : आज मनसेकडून राज्यातील ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मुंबईत मनसेकडून मुंबईतील समुद्र किनारे यांची स्वच्छता मोहीम रावबली जात असताना, राज्यातील ४० समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिम राबवली जात असल्याची माहिती मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिली, दरम्यान यावेळी अमित ठाकरे यांनी पालिकेत २५ वर्ष सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबविली असती तर, समुद्र किनारे स्वच्छ करण्याची वेळ आमच्यावर आली नसती असं अमित ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली.

दरम्यान, मुंबईत अवघ्या काही महिन्यांवर महानगर पालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने आज मनसेकडून राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती. तसेच पालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला.

राज्य सरकारकडून अपेक्षा ठेवता येणार नसल्याचं अमित ठाकरे म्हणाले. “समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाच्या बाबतीत कसं काम होणार? किनारे बघितले तर लक्षात येईल. आपला समुद्रकिनारा आहे. आपणच साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. सरकारकडे जबाबदारी देऊन आपण बघितलंय काय होतं”, असं ते म्हणाले. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेबाबत यासाठी इच्छाशक्ती लागते. गेली २५ वर्ष त्यांच्याकडे महानगर पालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत, असं अमित ठाकरे म्हणाले. पुढे माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या कुणालाही बीच साफसफाईची गरज लागली नसती. आधी तुमच्या शहरांवर, राज्यावर तुम्हाला प्रेम असायला हवं. कुणी सांगून ते निर्माण होत नाही, असं देखील अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, आरेचं जंगल शिवसेनेमुळे वाचलं नसून, लोकांमुळे वाचलं. लोकं रस्त्यावर उतरली, त्यांनी विरोध केला त्यामुळे आरेचं जंगल वाचलं, असं अमित ठाकरे म्हणाले.