पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती तर, परबांवर विश्वास आला असता – नितेश राणे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची पुन्हा शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. परब हे शिवसेनाप्रमुखांची शपथ का घेतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाही?, असा खोचक सवाल करतानाच 'अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है', असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं आहे.

    मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखा वकील माणूस सारखा शपथ घेत आहे. ईडीची चौकशी समोर आली की, यांना बाळासाहेब आठवतात, मुली आठवतात. बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेण्याऐवजी ते उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाहीत? जर त्यांनी स्व. शिवसेनाप्रमुखांऐवजी, पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर, अनिल परब यांच्यावर विश्वास बसला असता असं भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची पुन्हा शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. परब हे शिवसेनाप्रमुखांची शपथ का घेतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाही?, असा खोचक सवाल करतानाच ‘अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है’, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राणेंच्या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    आता कडवट शिवसैनिकाला आता भाजपच पर्याय आहे. अनिल परब हे सकाळी उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय शर्ट पण घालत नाहीत. अशा व्यक्तीला तुम्ही चौकशीला बोलावल्यावर उद्धवजींच्या छातीत धडकी भरल्यासारखं झालं आहे. ‘अनिल परब तो झांकी है उद्धव ठाकरे अभी बाकी है’, असं सूचक विधान आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख गायब झाले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख गायब आहेत तर परब यांना माहिती असेल.

    परब यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही चौकशीसाठी कधी बोलवतात यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं सुद्धा नितेश राणेंनी म्हटले आहे. अडचणीत आले की बाळासाहेब आणि वसुलीसाठी उद्धव ठाकरे अशी परब यांची अवस्था आहे. दर्शन घेऊन जायला केंद्रीय यंत्रणा ही काय मंगल कार्यालय नाहीये की, या आणि लग्न करुन जा. काही केल नाही तर शपथा कशाला घेता? दर्शन कसली घेत आहात?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.