आज रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान! तिन्ही मार्गांवर आहे मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहा आणि मगच ठरवा प्रवासाचा बेत

सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि त्यापुढे निर्धारित डाऊन धीम्या मार्गावर वळविली जाईल.

  मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आपल्या उपनगरी भागांवर आज अभियांत्रिकी व देखभालीची विविध कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते संध्याकाळी ३.५५ पर्यंत

  सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि त्यापुढे निर्धारित डाऊन धीम्या मार्गावर वळविली जाईल.

  सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

  हार्बर रेल्वे मार्ग

  ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे धीम्या मार्गावर सेवा उपलब्ध होणार नाहीत.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे / गोरेगांव करिता सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत सुटणाऱ्या सेवा बंद राहतील.

  अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणा-या आणि गोरेगांव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम रेल्वे मार्ग

  पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान अप तसेच डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ६ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. वांद्रे आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप तसेच डाऊन हार्बर मार्गावर १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत ५ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर गोरेगाव लोकल तसेच मध्य रेल्वे मार्गावर जाणाऱ्या लोकल्स व्यतिरिक्त चर्चगेट-गोरेगावकडे जाणाऱ्या काही धीम्या लोकल्स रद्द राहतील. या ब्लॉकसंबंधीची विस्तृत माहिती रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध आहे.