राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय; काँग्रेसच्या आक्षेपानंतर त्रिसदसस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब?

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महानगरपालिकांच्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत तीन सदस्यांच्या निर्णयावर चर्चा झाली. यामध्ये काँग्रेस कडून तीन सदस्यीय रचनेबाबत आक्षेप नोंदविला. मात्र या संदर्भात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी सरकार म्हणून निर्णय झाल्यानंतर त्यावर पुन्हा बदल करण्याऐवजी एकमताने शिक्का मोर्तब करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते.

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महानगरपालिकांच्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत तीन सदस्यांच्या निर्णयावर चर्चा झाली. यामध्ये काँग्रेस कडून तीन सदस्यीय रचनेबाबत आक्षेप नोंदविला. मात्र या संदर्भात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी सरकार म्हणून निर्णय झाल्यानंतर त्यावर पुन्हा बदल करण्याऐवजी एकमताने शिक्का मोर्तब करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते.

    या बाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर काँग्रेसच्या मंत्र्याकडून आक्षेप मांडण्यात आले, प्रदेश काँग्रेसची याबाबतची वेगळी भुमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याचे समजते.

    मात्र महाविकास आघाडी म्हणून याबाबत समन्वय समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर हा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याचे कळते. महाविकास आघाडीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विरोधकांचे आव्हान असल्याने एकजुटीने जो निर्णय झाला त्याच्या पाठीशी राहण्याची भुमिका घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यानी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आग्रह बाजूला ठेवून कॉंग्रेस सह महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे तीन सदस्यीय प्रभाग रचनेबाबत एकमत झाल्याने शिक्कामोर्तब झाल्याचे सागण्यात आले.