Important decisions of the state cabinet; Now the signs on the shops along the road are in Marathi

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करून सर्व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई : आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे , महाराष्ट्रात मराठीचा प्रसार आणि प्रचार आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

    महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करून सर्व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, त्यामुळे, ते यातून पळवाट शोधात होते. परंतु, आता छोट्या दुकानदारांना सुद्धा दुकानावरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहे. 
     
    या अधिनियमानुसार, दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने या नियमातून पळवाट शोधून काढत असल्याचे आढळून आले. अशा तक्रारी शासनास प्राप्त होत होत्या. त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. यावर कारवाई करत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेतली आणि हा कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती करण्यात आली आहे. जेणेकरून यातून कसलीही पळवाट शोधता येणार नाही.