Big expansion in Union Cabinet? 23 ministers will be required

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे  खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. याबाबत पक्षाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये नारायण राणे यांच्यासह राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या नावाचा विचार देखील झालेला नाही अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे  खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. याबाबत पक्षाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये नारायण राणे यांच्यासह राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या नावाचा विचार देखील झालेला नाही अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.

    भाजपचे ९ तर मित्रपक्षाचे तीन सदस्य

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका विद्यमान केंद्रीय मंत्र्याला घरी पाठवले जाण्याची शक्यता असून अन्य एका मंत्र्यांचे एक खाते कमी केले जाण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करत भाजपच्या ९ सदस्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता असून अन्य तीन सदस्य जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टीचे सदस्य असण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

    ही आहेत संभाव्य नावे

    मंत्रिमंडळात समाविष्ट होणा-या संभाव्य नावांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश) (राज्यसभा सदस्य), सरबनानंद सोनोवाल (आसाम) (माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार), सुशील कुमार मोदी (बिहार) (माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा सदस्य), त्रिवेंद्र सिंग रावत (संघ स्वयंसेवक आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री), दिनेश त्रिवेदी (पश्चिम बंगाल) (राज्यसभेचे माजी सदस्य), भुपेंदर यादव (राज्यसभा सदस्य, राजस्थान), अश्विनी वैष्णव (राज्यसभा सदस्य, ओडिशा), वरुण गांधी (लोकसभा सदस्य, पिलीभीत, उत्तर प्रदेश), जम्यांग सेरिंग नामग्याल  (लोकसभा सदस्य, लडाख)यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.