Ajit Pawar pune covid centre decision

मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई पुर्ण ताकदीने लढली जात आहे. आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन करावं लागलं त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर याकाळात राज्याला आर्थिक फटका बसला आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कामकाज योग्य नसते तर नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले नसते. सरकार ८ महिन्यांपासून करोनाचा सामना करतेय.

२८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारडून येणे बाकी आहे. केंद्राने जीएसटीचे नियम पाळायचे नाहीत. पाऊस, चक्रीवादळ, कापसाचे नुकसान आणि पिकांचं नुकसान झाले.

सरकार सतत अडचणींतून मार्ग काढत पुढे जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचा चेहरा पडल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना निवडणुकीच्या पराभवाची आठवण करून दिली.