कोरोनाला लगाम घालण्यासाठी महापालिकेची महत्त्वपूर्ण योजना; खासगी कार्यालयातील उपस्थितीकडे लक्ष ठेवणार

बाजारपेठा, मॉल, डीमार्ट या गर्दीच्या ठिकाणाकडे पालिकेचे लक्ष आहे. तेथे ॲण्टिजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासगी कार्यालयामध्ये ५० टक्के उपस्थितीचे आदेश शासनाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासन चिंताग्रस्त असून गर्दी कमी करण्यासाठी खासगी कार्यालयातील उपस्थितीकडे लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

    बाजारपेठा, मॉल, डीमार्ट या गर्दीच्या ठिकाणाकडे पालिकेचे लक्ष आहे. तेथे ॲण्टिजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासगी कार्यालयामध्ये ५० टक्के उपस्थितीचे आदेश शासनाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    मुंबईतील कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी महापालिका खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. खासगी कार्यालयांमधील उपस्थिती ५० टक्क्यांवर आल्यास लोकल ट्रेनमधीलही गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खासगी कार्यालयांमधील उपस्थितीकडे लक्ष देण्यासाठी महापालिका कठोर पावले उचलणार आहे. प्रत्येक विभागात महापालिकेची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके खासगी कार्यालयातील उपस्थितीवर नजर ठेवणार आहे.