20 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आले 1 हजार प्रवासी, फक्त 466 जणांचा शोध

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झालेल्या व ज्या देशात हा नवा व्हेरिएंट उदयास आला अशा आफ्रिकन देशांमधून गेल्या १५ दिवसांत किमान १,००० प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबई महानगर पालिकेला यापैकी 466 फक्त जणांची यादी मिळाली असून, त्यापैकी 100 प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेसह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिका त्या प्रवाशांशी संपर्क करून आवश्यक कार्यवाही करीत आहे. तसेच वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    मुंबई : कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट जगासाठी मोठा धोका बनत आहे. हे थांबवण्यासाठी सर्व देशांची सरकारे कामाला लागली आहेत. त्यातच आता मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्राला टेंन्शन देणारी बातमी समोर आली आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झालेल्या व ज्या देशात हा नवा व्हेरिएंट उदयास आला अशा आफ्रिकन देशांमधून गेल्या १५ दिवसांत किमान १,००० प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबई महानगर पालिकेला यापैकी 466 फक्त जणांची यादी मिळाली असून, त्यापैकी 100 प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेसह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

    महापालिका त्या प्रवाशांशी संपर्क करून आवश्यक कार्यवाही करीत आहे. तसेच वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले की, 466 प्रवाशांपैकी 100 मुंबईचे रहिवासी आहेत. आम्ही आधीच त्यांचे स्वॅबचे नमुने गोळा केले आहेत. उद्या किंवा परवा त्यांचा अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होईल. त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे काकाणी यांनी सांगितले.

    दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनला ‘चिंतेचा प्रकार’ म्हणून वर्गीकृत केले. मात्र, डब्ल्यूएचओच्या सल्ल्यानुसार पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये एस-जीनोम गहाळ झाल्याची चाचणी महापालिका करणार आहे.