In 'Lockdown', Indians 'Missed' Panipuri Swiggy's survey

स्विगीच्या सर्व्हेनुसार २०२० मध्ये भारतीयांना सर्वाधिक कमतरता जाणवली तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी. लॉकडाऊननंतर पाणीपुरीच्या दोन लाखांपेक्षा जास्त ऑर्डर आल्या, असे स्विगीने म्हटले. भोपाळ आणि बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या ग्राहकांनी ऑर्डर पोहोचवणाऱ्याला पाच–पाच हजार रुपये टिप दिल्याचेही स्विगीने सांगितले.

मुंबई :  कोरोना संकटकाळामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेरच्या पदार्थांचा आनंद घेता आला नाही. पण, ‘बिर्याणी’च्या चाहत्यांची संख्या मात्र काही कमी झाली नाही. ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीने पाचव्यांदा वार्षिक आकडेवारी जारी केली. लॉकडाऊनमध्ये भारतीयांनी सर्वात जास्त मिस केलेला पदार्थ म्हणजे पाणीपुरी असेही स्विगीने म्हंटले आहे.

स्विगीच्या रिपोर्टनुसार २०२० मध्ये बिर्याणीबाबत भारतीयांचे प्रेम कमी झाले नाही. प्रत्येक सेकंदाला एकापेक्षा जास्त बिर्याणीची ऑर्डर करण्यात आली आणि बिर्याणी भारतीयांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणून कायम राहिला. शिवाय तीन लाख नव्या युजर्सनी स्विगीवर पहिल्यांदाच बिर्याणीची ऑर्डर दिली.

मसाला डोसा दुसऱ्या क्रमांकावर

बिर्याणीनंतर मसाला डोसाने दुसरा क्रमांक पटकावला. मसाला डोसाच्या खालोखाल पनीर बटर मसाला, फ्राईड राईस आणि गार्लिक ब्रेडस्टिक्ट्सच्याही बऱ्याच ऑर्डर झाल्या.

सुस्ती घालवण्यासाठी चहा-कॉफी

रिपोर्टनुसार, दुपारच्या जेवणानंतर सुस्ती दूर करण्यासाठी स्विगीच्या ग्राहकांनी निरनिराळ्या चहा आणि कॉफीची ऑर्डर केली. यामुळे लॉकडाऊनमध्ये कॅपेचिनो, फ्लेवर्ड चहा आणि स्ट्रीट फूडच्या मागणीत वाढ झाली.

पाणीपुरीची सर्वाधिक आठवण