महाराष्ट्रात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नवाब मलिकांचे स्पष्ट संकेत!

आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या झापट्याने संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टाळेबंदी शिवाय पर्याय नसल्याचे सांगत स्पष्ट संकेत  दिले आहेत(In Maharashtra, there is no alternative but lockdown; Deputy Chief Minister Ajit Pawar, Home Minister Dilip Walse Patil, clear indications of Nawab Malik!) .

  मुंबई : आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या झापट्याने संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टाळेबंदी शिवाय पर्याय नसल्याचे सांगत स्पष्ट संकेत  दिले आहेत(In Maharashtra, there is no alternative but lockdown; Deputy Chief Minister Ajit Pawar, Home Minister Dilip Walse Patil, clear indications of Nawab Malik!) .

  नागरीकांकडून अद्यापही गर्दी करण्याचे प्रकार

  राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितले की, नागरीकांकडून अद्यापही गर्दी करण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्यातच ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढही होत आहे. त्यामुळे ही वाढ रोखण्यसाठी साप्ताहिक टाळेबंदी सारख्या उपायांच्या दिशेने राज्याची वाटचाल होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

  अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावल्याने ही वेळ महाराष्ट्रातही

  राज्यात वाढत्या रुग्णसंख्या पाहता ठाकरे सरकारने जमावबंदीसारखे सौम्य निर्बंध लावले. मात्र अद्यापही सर्वसामान्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याने हे निर्बंध अजून कठोर करण्यात येणार असल्याचा इशारा देत अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावल्याने ही वेळ महाराष्ट्रातही येण्याची शक्यता आहे. असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.  ते म्हणाले की, नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करायचे असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणे टाळावे आणि करोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  प्रादुर्भाव वाढला तर टाळेबंदीपर्यंत जावे लागेल

  दरम्यान, सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचे पालन झाले नाही आणि उद्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर टाळेबंदीपर्यंत जावे लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी देखील दिला आहे.  ते म्हणाले की सरकारच्या मनात टाळेबंदी लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय़ घ्यावा लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंबधी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचे पालन झाले पाहिजे. लग्नातील राजकीय नेत्यांच्या गर्दीवर बोलताना त्यांनी मोठे नेते, सामान्य व्यक्ती सर्वांनीच कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून या तत्वांनुसार मिरवणूका काढणे, फटाके फोडणे, गर्दी करणारे कार्यक्रम आयोजित करणे आदी गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.