मुंबईत रोज एक लाखावर लसीकरण ; लसीकरणाचा वेग वाढला

२१ जून नंतर लसीकरणाला वेग आला आहे. दिवसाला ५० हजारांचे लक्ष्य ठेवणाऱ्या मुंबईत आता एक लाख लसीकरण करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून दर दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पार पडत आहे. बुधवारी, २३ जून रोजी १ लाख ११ हजार ११० लोकांचे लसीकरण पार पडले. सर्वप्रथमच २१ जून रोजी मुंबईत १ लाख ०८ हजार १४८ लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी २२ जून रोजी १ लाख १३ हजार १३५ लोकांचे लसीकरण पार पडले.

  मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दरदिवशी एक लाख लसीकरण करण्याचे नियोजन पालिकेने केले होते. तीन दिवसांत एक लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबईत लसीकरणाला आता वेग आला आहे. मुंबईत सुरुवातीच्या काळात लसीकरण मोहीम अत्यंत धिम्या गतीने सुरु होती. लसीच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाला वेग येत नव्हता. आतापर्यंत रोज ५० हजाराच्या आसपास लसीकरण केले जात होते.

  मात्र २१ जून नंतर लसीकरणाला वेग आला आहे. दिवसाला ५० हजारांचे लक्ष्य ठेवणाऱ्या मुंबईत आता एक लाख लसीकरण करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून दर दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पार पडत आहे. बुधवारी, २३ जून रोजी १ लाख ११ हजार ११० लोकांचे लसीकरण पार पडले. सर्वप्रथमच २१ जून रोजी मुंबईत १ लाख ०८ हजार १४८ लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी २२ जून रोजी १ लाख १३ हजार १३५ लोकांचे लसीकरण पार पडले.

  गेल्या ८ जून रोजी मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९६ हजार ८६० जणांचे लसीकरण झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा लसीकरणाचा आकडा कमी आला होता. परंतु मागील तीन दिवसांपासून रोज एक लाखांहून अधिक लसीकरण केले जाते आहे. मुंबईत मागील तीन दिवसांमधील आकडेवारीचा विचार केल्यास १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे २१ जूनपासून अनुक्रमे ७५ हजार ३१६, ८० हजार ९३२ आणि ७९ हजार ७४८ एवढे लसीकरण झाले आहे. ही आकडेवारी पाहता १८ ते ४४ या वयोगटातील शुल्क आकारुन होणाऱ्या लसीकरणाचे प्रमाण ७५ ते ७७ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे.

  तीन दिवसांमधील लसीकरण –

  २१ जून – एकूण लसीकरण – १, ०८, १४८ (१८ ते ४४ वयोगट : ७५,३१६)
  २२ जून – एकूण लसीकरण – १,१३,१३५ (१८ ते ४४ वयोगट : ८०,९३२)