
मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी ३० तासासाठी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या ठिकाणी जलविद्युत स्थानकात काही मोठा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात अगोदरच १५ टक्के कपात अनिश्चित कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.
मुंबई : आगामी काळात पालिका निवडणुका तोंडावर असताना, आता पालिकेच्या अखत्यारितील कामांना सुद्धा वेग आला आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी ३० तासासाठी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या ठिकाणी जलविद्युत स्थानकात काही मोठा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात अगोदरच १५ टक्के कपात अनिश्चित कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. आता लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १५ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत ३० तासांसाठी दादर, परळ, वरळी, माहिम, माटुंगा, प्रभादेवी आदी भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं पाणी जपून वापरा, तसेच या दोन दिवशी पाणी पुरेल असा पाणीसाठा करुन ठेवा, असं पालिकेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
या भागात येणार नाही पाणी
संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग तसेच डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग या ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी ३० तास पाणी येणार नाही.
या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा
महालक्ष्मी, धोबीघाट, सातरस्ता या भागात १५ मार्च रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळं येथील रहिवाश्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.