In the ICU, the patient's eye was bitten by a rat; Mayor Kishori Pednekar says ...

मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले, डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आले की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे, याची खबरदारी घेतलेली आहे. पण तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवले नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्याने लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली.

  महापौरांनी पुढे म्हटले, आयसीयू वॉर्ड असल्याने तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरे पडते. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे.

  दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

  डॉक्टरांनी काय म्हटले?

  याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदरचा आयसीयू रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.