राज्यात गेले दोन दिवस २५ हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात आणखी वाढ होऊन नवीन बाधितांचा आकडा २७ हजार १२६वर पोहोचला. राज्यात गेल्या २४ तासांत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ४०० रूग्ण बरे झाले.
मुंबई : देशात एका दिवसात ४०,९५३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या १११ दिवसातील हा उच्चांक आहे. राज्यात कोरोना संसर्गाने गंभीर स्वरूप धारण केले असून शनिवारी २७ हजार १२६ नव्या रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंतची एका दिवसातील ही उच्चांकी रुग्णनोंद आहे.
राज्यात गेले दोन दिवस २५ हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात आणखी वाढ होऊन नवीन बाधितांचा आकडा २७ हजार १२६वर पोहोचला. राज्यात गेल्या २४ तासांत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ४०० रूग्ण बरे झाले.
सध्या राज्यात नऊ लाख १८ हजार ४०८ लोक गृह अलगीकरणात, तर ७,५९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या एक लाख ९१ हजार रूग्णांवर उपचार सुरू असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्यांपर्यंत खाली आले आहे.
देशात ४०,९५३ नवे रुग्ण
देशात एका दिवसात करोनाचे ४०,९५३ नवे रुग्ण आढळले. १११ दिवसांतील हा उच्चांकी आकडा असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. गेल्या २४ तासांत १८८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील बळींचा आकडा १,५९,५५८ वर पोहोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून आता ते ९६.१२ टक्के आहे.