येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ दवाखान्यात असेल आणि अर्धे मंत्री गायब असतील; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

राज्यात नव्या क्रांतीची सुरवात आहे. पुढील दोन-चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब असतील आणि अर्धे मंत्री हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya on Thackeray Government) यांनी केला आहे. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारचा वध करण्याची शक्ती देण्यासाठी आंबामाताकडे साकडे घालणार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.

    मुंबई : राज्यात नव्या क्रांतीची सुरवात आहे. पुढील दोन-चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब असतील आणि अर्धे मंत्री हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya on Thackeray Government) यांनी केला आहे. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारचा वध करण्याची शक्ती देण्यासाठी आंबामाताकडे साकडे घालणार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.

    मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोल्हापूर दौर्‍यावर जाताना वाघवाडी फाट्यावर भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी भ्रष्टाचार मुक्त भारत बनवला आहे. या ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र बनवला आहे. आम्ही भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो असे सोमय्या म्हणाले.

    मागील 12 महिन्यात एकापाठोपाठ दोन डझन घोटाळे बाहेर काढले. खुप धमक्या आल्या, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तर, कोठे पोलिस स्टेशनमध्ये बंद करण्याचा प्रयत्न झाला. परंतू मी जनतेच्या पाठिंब्यावर पुढे जाणार आहे. ज्यांच्यावर कारवाई सुरू होतेय ते गायब होत आहेत. सध्या अनिल देशमुख गायब झाले, मुंबईचे पोलीस आयुक्त गायब झाले, हसन मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये भरती झाले. अनिल देशमुख यांचा पत्ता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती आहे, त्यांनीच देशमुखांना लपवले असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.