पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा
पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा

राज्यातील घटना मन सुन्न करणाऱ्या असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

    मुंबई (Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांतील सर्व आरोपींनी कठोर शिक्षा व्हायला हवी. प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. करुणा शर्मा प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी बोलणे टाळत कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी प्रतिक्रीया दिली आहे.

    आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी
    राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. साकीनाका सारखी धक्कादायक घडल्यानंतर भाजपने त्यावर राजकीय टीका करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. याच मुद्द्यांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.

    राज्यातील घटना मन सुन्न करणाऱ्या असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.