rape

बापाने १४ वर्षाच्या पोटच्या गोळ्यालाच वासनेचा बळी बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी आजोळी गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दिली.

मुंबईतील एका वरिष्ठ पदावर असणाऱ्या बापाने १४ वर्षाच्या पोटच्या गोळ्यालाच वासनेचा बळी बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी आजोळी गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर उज्जैन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या पदावर कामाला असून, १२ जून रोजी आरोपीनं मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीचं सातत्यानं लैंगिक शोषण केलं. बापाकडून वारंवार लैंगिक शोषण होत असतानाच पीडिता काही दिवसांसाठी आपल्या आजोळी उज्जैनला गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तिने पुन्हा मुंबईत येण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने विचारणा केली. त्यानंतर पीडितेनं बापाकडूनच होत असलेल्या अत्याचाराची भयंकर गोष्ट आईला सांगितली. महिलेनं मुलीसह महिला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

पीडितेने दिेलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी जेव्हा तिची आई आजारी होती, तेव्हा वडील तिच्या बेडरुममध्ये आले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा मुलीवर अत्याचार केले. जेव्हा मुलीने अत्याचाराला विरोध केला. तेव्हा आरोपीनं तिला बहुमजली इमारतीत उंचावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली फेकण्याची धमकी दिली होती, असं पीडितेनं म्हटलं आहे. दरम्यान, पीडित मुलीनं सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.