दादर, सायन, महालक्ष्मी, करी रोड रेल्वे स्थानक आणि…पुलांच्या दुरुस्ती खर्चात वाढ; २६ कोटींची योजना ३३ कोटींवर

मुंबईतील टिळक पूल, रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी, करी रोड, सायन रेल्वे स्थानक, सायन रुग्णालय उड्डाणपुलासह दादर फुलमार्केट येथील पादचारी पुलांची दुरुस्तीमध्ये पूर्वीच्या आराखड्यापेक्षा आमूलाग्र बदल झाला आहे. पालिकेने यापूर्वी विविध उड्डाणपूल आणि पादचारी पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. पण, हिमालय पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांच्या स्ट्रक्टचरल ऑडिटनंतर २६ कोटी रुपयांच्या मूळ योजनेत सात कोटींची वाढ होऊन हा खर्च ३३ कोटी रुपयांवर गेला आहे.

    मुंबई : मुंबईतील टिळक पूल, रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी, करी रोड, सायन रेल्वे स्थानक, सायन रुग्णालय उड्डाणपुलासह दादर फुलमार्केट येथील पादचारी पुलांची दुरुस्तीमध्ये पूर्वीच्या आराखड्यापेक्षा आमूलाग्र बदल झाला आहे. पालिकेने यापूर्वी विविध उड्डाणपूल आणि पादचारी पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. पण, हिमालय पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांच्या स्ट्रक्टचरल ऑडिटनंतर २६ कोटी रुपयांच्या मूळ योजनेत सात कोटींची वाढ होऊन हा खर्च ३३ कोटी रुपयांवर गेला आहे.

    मुंबईतील शहर भागात विविध उड्डाणपूल आणि काही पादचारी पुलांची कामे पालिकेने सुरू केली आहेत. हिमालय पूल दुर्घटनेनंतर सर्वच पुलांची नव्याने ऑडिट करण्यात आले. त्याचवेळी, महालक्ष्मी रेल्वेस्थानकाकडील पुलाच्या भिंतीलगत काही बांधकामे असल्याने पालिकेस तिथे स्ट्रक्टचरल ऑडिट करता आले नव्हते.

    तसे सर्वेक्षण केल्यानंतर तांत्रिक सल्लागाराच्या अहवालानुसार महालक्ष्मी रेल्वेस्थानक पुलाच्या मजबुतीकरणासाठी विविध कामे करण्याचे ठरविण्यात आले. त्यात पुलावर अधिभार कमी करण्याविषयीची कामांचाही समावेश आहे. त्यामुळे मूळ कामांच्या खर्चात वाढ झाली आहे. पालिकेने सुरुवातीस पुलांच्या दुरुस्तीसाठी मागविलेल्या निविदेतील कंत्राटदारास मूळ २६ कोटी ६७ लाख रु.च्या कंत्राटात ६ कोटी ६७ लाख रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे, या योजनेचा एकूण खर्च ३३ कोटी ८६ लाख रुपयांवर गेला आहे.