प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

उत्पन्न दिवसेंदिवस वाढविण्यासाठी महामंडळ शर्थीचे प्रयत्न करत आहे. येत्या काही महिन्यात दर दिवसा ३२ ते ३३ लाख उत्पन्न हाेण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे, प्रवासी वाहतूकीमुळे ठप्प झालेल्या महामंडळाला मालवाहतूक सेवेचा आधार मिळाला असल्याचे बाेलले जात आहे.

  मुंबई: आर्थिक ताेटा सहन करत तग धरुन असलेली एसटी काेराेना काळात पूर्णपणे बंद असल्याने काेलमडली हाेती. पण मे २०२० पासून एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु करत एसटी महामंडळाला एक नवसंजीवनी दिली आहे. या सेवेमुळे मागील वर्षभरापासून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत तर आहेच पण उत्पन्नाचे नवे स्त्राेत म्हणून मालवाहतूक सेवेकडे पािहले जात आहे. सध्या दर महिन्याला या सेवेमुळे तब्बल ६ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नात अधिक भर घालण्यासाठी महामंडळ विविध याेजना आखत जाेरदार प्रयत्न करत आहेत.
  काेराेना काळात प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प हाेती, ज्यामुळे एसटीचे उत्पन्न पूर्णपणे घटले हाेते. या आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाला सावरण्यासाठी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात आली,ज्यात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दूरदुष्टी दाखवत एसटीसाठी एक नवीन मार्ग शाेधून काढला व एसटीला मालवाहतूक सेवेचा नवीन पर्याय मिळवून देत महामंडळाला उभारी दिली. ज्यामुळे अर्थचक्राला चालना मिळाली.
  राज्य परिवहन महामंडळाने २१ मे २०२० पासून मालवाहतुक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाने प्रवासी बसेसचे मालवाहतूकीच्या वाहनामध्ये रुपांतरण केले यात प्रवासी बसेसची आसने, खिडक्या काढून वाहन पूर्ण बंदिस्त करुन वाहनाला मागील बाजूने दरवाजा करण्यात आला.
  मागील वर्षभरापासून ही सेवा एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळून देत आहे. सुरुवातीला दिवसाला १ ते २ लाख रुपये उत्पन्न मिळत हाेते, वर्षभरात या सेवेने वेग धरत आता दिवसााला २२ ते २३ लाख उत्पन्न मिळत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे उत्पन्न दिवसेंदिवस वाढविण्यासाठी महामंडळ शर्थीचे प्रयत्न करत आहे. येत्या काही महिन्यात दर दिवसा ३२ ते ३३ लाख उत्पन्न हाेण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे, प्रवासी वाहतूकीमुळे ठप्प झालेल्या महामंडळाला मालवाहतूक सेवेचा आधार मिळाला असल्याचे बाेलले जात आहे.

  एसटी महावाहतूक सेवेबाबत
  -सध्या दिवसाला २२ ते २३ लाख उत्पन्न
  – दर महिन्याला ६ काेटींचे उत्पन्न
  -११५० गाड्या (ट्रक) मालवाहतूक सेवेत
  – महिन्याला अडीच काेटी डिझेल खर्च
  -वेतन व इतर खर्च १ काेटी
  -येत्या काही दिवसात दिवसाला ३२ ते ३३ लाख उत्पन्न मिळण्याकरीता जाेरदार प्रयत्न

  महामंडळाचे मुख्य वाहतूकदार
  शिर्डी संस्थान इतर अनेक शासकीय संस्था
  अल्ट्राटेक सिमेंट
  वंडर सिमेंट
  राईस मिल्स, साेयाबीन तेल मिल्स
  अलाना अाॅईल मिल्स, साखर कारखाने, बांधकाम कंपन्या
  आणि इतर अनेक खासगी कंपन्या

  कोरोना प्रादुर्भावामुळे प्रवाशी उत्पन्न कमालीचे घटले आहे व अजूनही त्या मध्ये सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे मालवाहतूक हा एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा स्रोत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही आनंददायी बाब आहे. श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस