एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केलं आरोपपत्र, पत्नी-जावायचाही समावेश

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खडसे यांच्या पत्नी, जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने खडसे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

    मुंबई : भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खडसे यांच्या पत्नी, जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने खडसे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

    दरम्यान खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरीसह आणखी दोघांविरोधात 2000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात ईडीने शुक्रवारी भोसरी (पुणे) जमीन व्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

    या प्रकरणाशी संबंधित चौधरी यांना 7 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. खडसे कुटुंबाचे वकील, अधिवक्ता मोहन टेकवडे म्हणाले की, त्यांनी अद्याप आरोपपत्र पाहिले नाही आणि त्याचा अभ्यास केल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ.