कोविड-१९ विरोधातील लढ्याला आणखी वेग देण्यासाठी भारताला गरज आहे तिसऱ्या लशीची, स्पुटनिक व्ही ठरू शकेल सुयोग्य निवड: तज्ज्ञ

आजपर्यंत विकसित करण्यात आलेल्या प्रमुख कोविड लशींपैकी केवळ गॅम-कोविड-वॅकमध्ये हा दृष्टिकोन वापरण्यात आला आहे. स्पुटनिक व्हीने तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये ९१.६ टक्के परिणामकारकता दर दाखवला. यामध्ये रशियातील १९,८६६ स्वेच्छेने सहभागी सदस्यांच्या डेटाचा समावेश होता. या सर्वांना लशीचा पहिला व दुसरा असे दोन्ही डोस देण्यात आले.

  मुंबई : डीसीजीआयची मान्यता प्राप्त केलेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लशींच्या माध्यमातून फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारशक्ती पुरवून भारत इम्युनायझेशनच्या दिशेने स्थिरपणे पुढे जात आहे. एका बाजूला भारत कोविड-१९ लशी भूतान, मालदिव्ज, नेपाळ, म्यानमार आणि बांग्लादेश या शेजारी देशांना पुरवत आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाची लस उत्पादन व डिलिव्हरीची क्षमता परदेशी लस उत्पादक कंपन्यांद्वारे अधिक चांगल्या निष्पत्तीसाठी वापरली जात आहे. भारताने कोविड-१९ विरोधातील लढ्याबाबत एक सामूहिक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. खरे तर जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लसीकरण प्रक्रियेची मागणी पूर्ण करण्यासाठी अन्य देशांतून अधिक सुरक्षित व प्रभावी लशी आणणे समर्पक ठरणार आहे.

  मात्र, २४ फेब्रुवारी रोजी भारतातील औषध प्राधिकरणाने डॉ. रेड्डीज या देशातील चाचण्यांमध्ये मदत करत असलेल्या भारतीय औषधनिर्मिती कंपनीला मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेला इम्युनोजेनिसिटीबाबतचा डेटा पुरवण्यास सांगितले होते. अर्थात देशाने याच वर्षी जानेवारी महिन्यात दोन एतद्देशीय लशींना परिवर्तित मानकांच्या आधारे आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे हे लक्षात घेता देशभरातील तज्ज्ञ मंजुरी प्रक्रियेवर प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, कोवॅक्सिनला परिणामकारतेविषयीच्या डेटाशिवाय “क्लिनिकल ट्रायल मोड”वर असताना मर्यादित मंजुरी देण्यात आली.

  “कोविड-१९ साथीने जगभरात आरोग्याच्या व अर्थकारणाच्या दृष्टीने मोठे आव्हान निर्माण केले आहे आणि या साथीवर मात करायची असेल तर राष्ट्रवादी धोरणे टाळून जागतिक सहकार्याची कास धरण्याखेरीज पर्याय नाही हे सत्य आहे. हा अखिल मानवतेसाठी करावयाचा जागतिक प्रयत्न असला पाहिजे. उदाहरणार्थ, लस उत्पादन क्षमता जगात सर्वाधिक असल्यामुळे भारताला जागतिक स्तरावरील महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून यापूर्वीच मान्यता प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे भारतानेही जगभरात विकसित होणाऱ्या सर्वोत्तम कोविड-१९ लशी उपलब्ध करून घेण्याचा न्याय्य मार्ग जनतेसाठी खुला केला पाहिजे”, असे भारतातील मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख म्हणाले.

  गेल्याच महिन्यात लॅन्सेट या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित नियतकालिकांपैकी एकाने स्पुटनिक व्ही या लशीच्या क्लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याची निष्पत्ती प्रसिद्ध केली आहे. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये सातत्यपूर्ण व सशक्त असा संरक्षक परिणाम दिसून आला आहे. गॅम-कोविड-वॅक या नावानेही ओळखली जाणारी ही लस तीव्र स्वरूपाचा श्वसनविकार कोरोनाव्हायरस २ (सार्स-कोव्‍ह-२) स्पाइक प्रोटिन व्यक्तीकरणासाठी अडेनोव्हायरस२६ (ॲड२६) आणि अडेनोव्हायरस ५ (एडी५) असे विषम (हेटरोलॉगस) रिकॉम्बिनंट अडेनोव्हायरस वापरते. लोकसंख्येत अडेनोव्हायरसची इम्युनिटी पूर्वीपासून अस्तित्त्वात असेल तर त्यावर मात करण्याचा हेतू दोन वेगवेगळ्या सेरोटाइप्सच्या वापरामागे आहे (हे २१ दिवसांच्या अंतराने दिले जातात).

  आजपर्यंत विकसित करण्यात आलेल्या प्रमुख कोविड लशींपैकी केवळ गॅम-कोविड-वॅकमध्ये हा दृष्टिकोन वापरण्यात आला आहे. स्पुटनिक व्हीने तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये ९१.६ टक्के परिणामकारकता दर दाखवला. यामध्ये रशियातील १९,८६६ स्वेच्छेने सहभागी सदस्यांच्या डेटाचा समावेश होता. या सर्वांना लशीचा पहिला व दुसरा असे दोन्ही डोस देण्यात आले.

  “स्पुटनिक व्हीची सध्या सुरू असलेली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही कोविड लसीकरणासाठी चाललेल्या अविश्रांत प्रवासातील मैलाचा दगड ठरली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि रशियन एजन्सींमधील भागीदारीनंतर हे शक्य होऊ शकेल. स्पुटनिक व्ही रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे (आरडीआयएफ) जगभरात व्यावसायिक स्तरावर आणली जात आहे.

  आरडीआयएफने सप्टेंबरमध्ये डॉ. रेड्डीजशी करार केला. त्यानुसार भारतीय औषधनिर्माण कंपनी डॉ. रेड्डीजला परवाना मंजूर झाल्यास ते समन्वयात्मक अभ्यास करणार होते व १०० दशलक्ष लोकांना डोस देणार होते. हा आकडा नंतर १२५ दशलक्ष करण्यात आला. भारतात नुकतीच मंजुरी मिळालेली कोविड १९ लस अस्ट्राझेनेकाच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये ६२.१ टक्के परिणामकारता दर दिसून आला आहे, असे कंपनीने डिसेंबरमधील लॅन्सेटच्या अंकात प्रसिद्ध केले आहे. तर फायझर आणि स्पुटनिक या जगात अन्यत्र मंजुरी मिळालेल्या लशींचा विषाणूविरोधातील परिणामकारकतेचा दर ९० टक्क्यांहून अधिक आहे.

  स्पुटनिक व्ही दोन ते आठ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते (३५.६ ते ४६.४ अंश फॅरनहिट). अनेक लशींना साठवण्यासाठी याहून खूप कमी तापमानाची आवश्यकता भासते. आजच्या तारखेला स्पुटनिक व्ही आणि फायझरने ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारता सिद्ध केली आहे, तर ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाचा परिणामकारता दर त्यांच्या उत्पादकांनी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध केल्यानुसार ६२.१ टक्के आहे. रोचक बाब म्हणजे, अस्ट्राझेनेकाची कोविड-१९ प्रतिबंधाची परिणामकारकता सरासरी ७० टक्के आहे, असे भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) नमूद केले आहे. ही नियमित समूहातील सरासरी/मध्यगा परिणामकारकता आहे. या समूहाला दोन पूर्ण डोस देण्यात आले. त्यांच्यातील परिणामकारता अर्धा डोस दिला असता ६२ टक्के तर पूर्ण डोस दिला असता ९० टक्के होती. भारतात पूर्ण डोस दिले जाणार आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा येथे कोठेतरी पारदर्शकतेचा अभाव आहे आणि सर्व अंगे ध्यानात घेऊन माहितीपूर्ण निर्णय केला जाणे आवश्यक आहे. विचारांती दिलेला निर्णय हा लसीकरणाची उत्सुकतेने वाट बघणाऱ्या, भारतातील व जगभरातील, लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यात मोठी भूमिका बजावू शकतो,” असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. गजेंद्र सिंग सांगतात.

  यासंदर्भात डॉ. पुढे म्हणाले, “भारतासाठी सुयोग्य लस आणण्यासाठी एकाहून अधिक मुद्दयांचे मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. लशीची परिणामकारकता लस ज्या पायावर उभी आहे, त्यावर अवलंबून असते. स्पुटनिक व्ही मानवी अडेनोव्हायरस प्लॅटफॉर्म वापरते, तर फायझर आणि मॉडेर्नासारख्या लशी मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए वापरून विकसित करण्यात आल्या आहेत. या तंत्रज्ञानात जेनेटिक कोड काही प्रमाणात पेशींमध्ये आणला जातो. ही सार्स-२ विषाणूवरील सरफेस प्रोटिन (स्पाइन नावाने ओळखले जाणारे) तयार करण्यासाठी वापरली जाणारी कृती आहे. याशिवाय कोविशील्ड स्पुटनिक व्ही यांसारख्या लशी भारतीय प्रदेशासाठी उत्तम आहेत. कारण, त्या +२ ते +८ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्या जाऊ शकतात. याउलट एमआरएनए लशी साठवण्यासाठी उणे ७० अंश ते उणे २० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे.”

  महत्त्वाचे म्हणजे स्पुटनिक व्ही लशीला उत्तर व दक्षिण अमेरिका, मध्यपूर्व, युरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक देशांमध्ये यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. अलीकडेच मेक्सिको आणि इजिप्त या देशांमध्ये या लशीला मंजुरी मिळाली आहे. ३५हून अधिक देशांमध्ये मंजुरी मिळाल्यामुळे ती आता मंजुरी देणाऱ्या नियामक यंत्रणांच्या संख्येनुसार जगातील आघाडीच्या तीन कोरोनाविषाणू लसींपैकी एक झाली आहे.

  संपूर्ण जगाला थांबवून टाकणाऱ्या विषाणूविरोधातील लढा पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी मिळून अनुकूल उपाय योजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने साथीविरोधातील लढा कायम तर ठेवलाच पाहिजे पण तो जिंकलाही पाहिजे. यासाठी राष्ट्रवादाच्या पलीकडील विचार करून एक व्यवहार्य दृष्टिकोन ठेवत अन्य देशांशीही सहयोग आवश्यक आहे.

  संदर्भासाठी येथे क्लिक करा