विश्वचषक स्पर्धेत भारताचे अभियान आजपासून सुरु, पहिल्याच सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आजपासून भारताचे अभियान सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. ग्रुप स्टेजमध्ये यश धुलच्या भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे मोठं आव्हान असणार आहे. भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित होईल. कारण पुढचे दोन सामने तितके कठीण नाहीत.

    त्रिनिदाद : एकिकडे दक्षिण आफ्रिकेत भारताने कसोटी मालिक गमावली आहे, २-१ ने भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर दुसरीकडे १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आजपासून भारताचे अभियान सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. ग्रुप स्टेजमध्ये यश धुलच्या भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे मोठं आव्हान असणार आहे. भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित होईल. कारण पुढचे दोन सामने तितके कठीण नाहीत. कालच दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या सिनियर संघाचा पराभव झाला होता. 2-1 ने ही मालिका भारताने गमावली आहे, त्याचा वचपा अंडर १९ टिम काढणार का, हे पाहावे लागेल.

    दरम्यान, सराव सामन्यातील आपला फॉर्म कायम राखण्याचा अंडर 19 टीमचा प्रयत्न असेल. सराव सामन्यात भारताच्या अंडर 19 टीमने वेस्ट इंडिजचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला होता. अंडर 19 वर्ल्डकप आधी झालेले दोन्ही सराव सामने भारताने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीमला हरवलं होतं. दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही आपले सराव सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धचा सराव सामना सात विकेटने जिंकला होता. त्यामुळे आजचा अटी-तटीचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे.

    वेस्ट इंडिजमध्ये आज पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना होत आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. अलीकडच्या काळात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. 2020 नंतर दोन्ही संघ दोनवेळा आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकलेत. त्यामुळं आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेंमीचे लक्ष लागले आहे.

    आकडेवारुन अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला आहे हे दिसते. दोन्ही देशांच्या अंडर 19 टीममध्ये आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. यात 16 वेळा भारत जिंकला आहे, तर फक्त सहा वेळा दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकलाय. जास्त सामने भारताने जिंकले असेल, तरी अंडर 19 वर्ल्डकप मध्ये दक्षिण आफ्रिका भारतावर वरचढ ठरली आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. त्यात भारताने तीन तर दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत. त्यामुळं आजचा सामना नक्किच अटीतटीचा होणार आहे. आजचा सामना कोणता संघ जिंकतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.