Infiltration of Naxalite movement in ST strike; Add. Gunaratna Sadavarten's shocking claim

एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला(Infiltration of Naxalite movement in ST strike; Add. Gunaratna Sadavarten's shocking claim).

  मुंबई : एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला(Infiltration of Naxalite movement in ST strike; Add. Gunaratna Sadavarten’s shocking claim).

  गुणरत्न सदावर्ते न्यायमूर्तींना म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या असेही त्यांनी म्हटले आहे.

  संपकऱ्यांसाठी लढण्याचे आश्वासन

  मुंबई उच्च न्यायालयात आज एसटी संपासंदर्भात मोठी सुनावणी झाली. ही सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु, या एसटी संपामध्ये काही नक्षली चळवळीचा मुद्दा आता समोर आला होता. न्यायालयाच्या सुनावणीनंतर अॅड. गुणारत्ने सदावर्ते संपकऱ्यांची भेट घेण्यासाठी मैदानात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या नावांची घोषणा देत त्यांनी एसटी संपकऱ्यांसाठी लढण्याचे आश्वासन दिले. तसेच छत्रपती शिवजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ यांना अभिवादन करीत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

  युनियन म्हणून माझे दुकान नाही

  आझाद मैदानात संपकऱ्यांशी बोलताना गुणावर्ते सदावर्ते यांनी म्हटले की, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा युनियन म्हणून माझे दुकान नाही. तसेच एखाद्या संघटनेचा मालकही नाही. तुमच्या मनावर राज्य करणारा तुमचा साधारण भाऊ आहे. मला न्यायालयासमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान द्विअर्थी होते. परंतु, मला संपकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे होते, राजकारण करायचे नव्हते. अनिल देशमुखसारख्या व्यक्तीला कारागृहात जाऊन बसवले, अशा कुटुंबातील आम्ही आहोत, असे गुणारत्ने सदावर्ते यांनी म्हटले आहे.