
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल-डिझेलचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत.
मुंबई : पाच राज्यातील निवडणुका होताच पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतील अशी जी भीती व्यक्त केली जात होती, ती खरी ठरताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल-डिझेलचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे भाव याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत. देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे. त्यामुळं या महागाईमुळं अनेकांनी सार्वजनिक प्रवासाला महत्त्व देत आहेत.
जनता दिवसेंदिवस महागाईमुळं त्रस्त असून, आगामी काळात सुद्धा महागाई वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज असून ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज असून, जीवनावश्यक वस्तु तसेच भाज्यांच्या दरात सुद्धा वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.