मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होम क्वारंटाईन होणार, शासकिय निवासस्थानी राहणार असल्याची माहिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले. या संगळ्या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुढे आली.

    मुंबई : राज्याच्या राजकारणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ माजली असतानाच मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आले असल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार आहेत. हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

    आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आल्याने विलगिकरणात

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले. या संगळ्या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुढे आली. तसेच आदित्य यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहावे, असे आवाहन केले.

    कोरोना चाचणीही केली

    त्यानुसार काल शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला कि नकारात्मक आला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होम क्वारंटाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढील काळात कितपत सक्रिय कामकाजात राहतील याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.