सरपंचांवर अन्याय, शेतकऱ्यांना साईवाल गायी देण्याचे वचनही विसरले! पशुसंवर्धन मंत्र्यांची स्थिती प्रचंड वाईट; चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडल्या समस्या

महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या घोषणा करते पण त्यासाठी निधी देत नसल्याचे भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पशुसंवर्धन खात्याला अर्थसंकल्पात किती निधी मिळाला हे स्पष्ट नसताना आ. शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांना साईवाल गायी देण्याचे वचन दिले. एकीकडे पशुसंवर्धन खात्याचे अर्थकारण मजबूत नसून,  साईवाल गायींसाठी किमान ५ हजार कोटींची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले(Injustice on Sarpanches, forgot the promise to give Saiwal cows to farmers! The situation of the Animal Husbandry Minister is very bad; Problems raised by Chandrasekhar Bavankule ).

    सरपंचांवर अन्याय

    ऊर्जामंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाने पथ दिव्यांच्या बिलाचा भार सरपंचाच्या खांद्यावर दिला. बिल भरले नाही तर कारवाईचे करू असे पत्र पाठवले, हे चुकीचे आहे. पथदिव्यांचे बिल हा ऊर्जा मंत्रालयाचा विषय असून, सरपंचांवर अन्याय असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सरपंचांना पाठवलेले कारवाईचे पत्र परत घेण्याची त्यांनी मागणी केली. तसेच कंत्राटदारांना वेळेत निधी न दिल्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना थंडबस्त्यात गेली. साधारणतः ३ हजार कोटींचा निधी यासाठी अपेक्षित असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

    वैधानिक मंडळ पुन्हा जिवंत होणे गरजेचे

    स्थानिक विकासाचा पाया असलेले राज्यातले वैधानिक मंडळ पुन्हा जिवंत होणे गरजेचे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच क्रीडा क्षेत्राशी निगडित घोषणा पूर्ण करण्यासाठी, महिला बालविकास मंत्रालय आणि ग्राम विकास मंत्रालयाशी निगडित योजना पूर्ण करण्यासाठी जादा निधी देण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.