अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला NCB कडून अटक; टेरर फंडिंग आणि ड्रग्ज सप्लायच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत मोठा खुलासा

इक्बालच्या चौकशी दरम्यान, एनसीबीने मुंबई मध्ये ठिक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींची चौकशीमध्ये चरस सप्लायचं कनेक्शन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी असल्यानं एनसीबीनं ठाण्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या इक्बाल कासकरला रिमांडमध्ये घेतलं आहे.

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई NCB ने आपल्या ताब्यात घेतले आहे. (underworld don dawood ibrahim brother iqbal kaskar arrested by mumbai ncb) मुंबई ड्रग्ज प्रकरणात प्रोडक्शन वारंट वर एनसीबीने इक्बाल कासकरची कस्टडी घेतली आहे.

    इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या जेलमध्ये अटकेत आहे. ड्रग्ज प्ररकणी आता त्याची एनसीबी मार्फत चौकशी होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यन एनसीबीला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज सप्लायसाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

    इक्बालच्या चौकशी दरम्यान, एनसीबीने मुंबई मध्ये ठिक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींची चौकशीमध्ये चरस सप्लायचं कनेक्शन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी असल्यानं एनसीबीनं ठाण्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या इक्बाल कासकरला रिमांडमध्ये घेतलं आहे.

    नुकतंच एनसीबीने चरसचे दोन कंसाइनमेंट मुंबईतून हस्तगत केले. पंजाबमध्ये राहणारे काही लोक काश्मीर येथीव बाईकवरुन रोडमार्गे हे चरस मुंबईला आणायचे. या प्रकरणात जवळपास 25 किलो चरस हस्कगत केला होता. या प्रकरणाची चौकशी करत असताना एनसीबीला अंडरवर्ल्ड कनेक्शन मिळून आलं. यामुळंच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीनं कस्टडीत घेतलं आहे.