“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का?” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण

कलाकारांबद्दल अफवा पसरवण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अनेक वेळा अनेक कलाकारांबद्दल मृत्यूची बातमी पसरली होती. अलीकडेच सपना चौधरीच्या मृत्यूची बातमीही पसरवण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीने यावर उत्तर दिले.

  कलाकारांबद्दल अफवा पसरवणे आजकाल सामान्य झालं आहे. अशाच काहीशा अफवा प्रसिध्द गायक बप्पी लहरी यांच्याबद्दल पसरवण्यात आल्या.सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की आयकॉनिक गायकाची तब्येत बिघडत चालली आहे, ज्यामुळे त्याने आपला आवाज गमावला आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.

  आपल्या आरोग्याबाबतच्या या चर्चा पाहताच अखेर खुद्द बप्पी लहरी यांनीच ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली. ‘माझ्या आरोग्याबाबत काही माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि वृत्त ऐकून मला वाईट वाटतंय. चाहते आणि हितचिंतकांच्या आशीर्वादानं मी पूर्णपणे बरा आहे’, असं बप्पी दांनी एका पोस्टमध्ये लिहिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

  बप्पी लाहिरीच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत. चाहतेही या पोस्टवर कमेंट करून त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने म्हटलय की, गणपती बाप्पा तुम्हाला नेहमी निरोगी ठेवो, तर दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की तुम्हाला आता 100 वर्षे जगायचे आहे.

  बप्पी लहरी यांची ही पोस्ट वाचून त्यावर फॉलोअर्सप्रमाणेच कलाकारही व्यक्त झाले. गायक शान यानं कमेंट करत आरोग्याबाबतच्या या अफवा निराशाजनक असल्याचं म्हणत यातून लोकांना काय फायदा मिळतो असा संतप्त प्रश्न उपस्थित केला.

  कलाकारांबद्दल अफवा पसरवण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अनेक वेळा अनेक कलाकारांबद्दल मृत्यूची बातमी पसरली होती. अलीकडेच सपना चौधरीच्या मृत्यूची बातमीही पसरवण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीने यावर उत्तरही दिले.