भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? भाजप नेत्यांनी चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, संजय राऊतांची बोचरी टिका

भाजप नेते चंद्रकांत पाटील चांगले आणि सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

    नवी दिल्ली : देशात आगामी पाच विधानसभा निवडणुका होत आहेत, या धरतीवर सर्वंच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान आज नवी दिल्लीत खासदार संजय राऊत यांनी भाजप टिकास्त्र सोडले. भाजप नेते चंद्रकांत पाटील चांगले आणि सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का? हे पाहावं लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊत यांनी लगावला. नवी दिल्ली येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला.

    दरम्यान, गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका त्यांनी केली. उद्या तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांशी भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

    शेतकरी नेते राकेश टिकेत लढाई संपवून घरी गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या भेटीतील चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच कालच्या पंतप्रधानांच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेला भाजप नेते कसे उत्तर देतात हे पाहवे लागेल.