अखेर ठरलं… या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवलं आहे.

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात मतभेद सुरु झाले होते. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावण्यात आले होते. आता आध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

    या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाहीये. थोड्याच वेळापूर्वी महाविकास आघाडी सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवलं आहे.

    भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहित विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशीही विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा निवडणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली.