पत्नीचे संरक्षण आणि हित जपणे ही पतीची जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

लग्न ठवरविताना मुलीच्या घरच्यानी १० ग्रॅम सोने हुंडा म्हणून देण्याचे कबुल केले होते. मात्र, लग्नानंतर ते देण्यास मुलीच्या माहेरचे कमी पडले म्हणून आरोपी नवऱ्याकडून पत्नीला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. अनेकदा तिला धमकावले आणि मारहाणही केली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्याविरोधात मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि पतीला अटक करून कनिष्ठ न्यायालयात हजर केले.

  • पत्नीच्या हत्येविरोधातील शिक्षा रद्द करण्यास नकार

मुंबई : आपल्या पत्नीचे संरक्षण करणे आणि तिचे हित जपणे ही पतीची प्रथम जबाबदारी असते. मात्र, या प्रकरणात पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यामुळे संरक्षण आणि हित जपण्यास पती अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी पतीने केलेला अर्ज फेटाळून लावला.

लग्न ठवरविताना मुलीच्या घरच्यानी १० ग्रॅम सोने हुंडा म्हणून देण्याचे कबुल केले होते. मात्र, लग्नानंतर ते देण्यास मुलीच्या माहेरचे कमी पडले म्हणून आरोपी नवऱ्याकडून पत्नीला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. अनेकदा तिला धमकावले आणि मारहाणही केली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्याविरोधात मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि पतीला अटक करून कनिष्ठ न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्याला पत्नीच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली. त्याविरोधात आरोपी पतीने उच्च न्यायालयात धाव घेत कनिष्ठ न्यायालयातील शिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी फौजदारी याचिका दाखल केली. त्यावर नुकतीच न्या. साधना जाधव आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या समोर सुनावणी पार पडली.

तेव्हा, आपल्या पत्नीचे संरक्षण करणे आणि तिचे हित जपणे ही पतीची प्रथम जबाबदारी असते. हुंडा मिळाला नाही म्हणून पती या कर्तव्यापासून पळू शकत नाही. कारण, कोणतीही स्त्री पतीवर विश्वास ठेवून वैवाहिक जीवनात प्रवेश करते. त्यामुळे तिच्या विश्वासाचं आणि तिचे संरक्षण करणे ही पतीची नैतिक जबाबदारी आहे. सदर प्रकरणात पती हुंड्यासाठी आपल्या पत्नीप्रति असलेले कर्तव्य आणि तिचे संरक्षण करण्यास अपयशी ठरला. त्यातच त्याने मुलीच्या आईला तोंड बंद ठेवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या नावावरील दीड एकर जमीन मुलाच्या नावावर करतो असेही तिला आश्वासन दिले. मात्र, आरोपी पतीने आपल्याच मुलाला आईच्या मायेपासून पोरक केलं हे तो विसरला. तसेच पत्नीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केली आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दुसरीकडे, मृत महिलेच्या कानातील रिंग आणि पायातील पैंजण गायब आहे. तसेच तिच्या शरीरावर काही खुणाही आहेत. याचा अर्थ मृत महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी झटापट केली असावी, असा निष्कर्ष काढत खंडपीठाने आरोपीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि त्याला दिलासा देण्यास नकार दिला.