भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे खरं आहे, नवाब मलिक यांची धक्कादायक माहिती

भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला. आणि हे पवारसाहेबांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले. त्यावेळी मी उपस्थित होतो हे सत्य आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता, मात्र भाजपाच्या या आग्रहाला पवारसाहेबांनी स्पष्ट नकार दिला होता. अशी धक्कादायक माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

    मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे मागील काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि एनसीबी यांनी कसे संशायस्पद आणि एकतर्फी अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला अटक केली, यावरुन मंत्री नवाब मलिक यांनी काही सवाल उपस्थित केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता मलिक यांनी नवीन एक खुलासा करत, धक्कादायक माहिती दिली आहे. यावरुन आता चर्चा रंगताना दिसत आहे.

    सन २०१९ मध्ये भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे पवारसाहेबांनी बुधवारी सांगितले हे खरं आहे. अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समोरुन ऑफर देत आपण दोघांनी सरकार स्थापन करु आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादीच सरकार आणि अशी ऑफर भाजपाकडून आली असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

    तसेच भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला. आणि हे पवारसाहेबांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले. त्यावेळी मी उपस्थित होतो हे सत्य आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता, मात्र भाजपाच्या या आग्रहाला पवारसाहेबांनी स्पष्ट नकार दिला होता. अशी धक्कादायक माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनंतर सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. हि माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला असून, सर्वंजण चकीत झाले आहेत. त्यामुळं मलिक यांच्या धक्कादायक माहितीनंतर महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांकडून कोण-कोणत्या प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.