राज्यात पुन्हा परतीचा पाऊस बरसणार, 26 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

देशात काही ठिकाणी उत्तरपूर्व म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. देशात ईशान्य मोसमी वारे म्हणजेच परतीचा मान्सून वाऱ्यांमुळे 26 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

  मुंबई : देशातून सध्या नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच राजस्थानातून देशाबाहेर जात आहे. देशात काही ठिकाणी 26 ऑक्टोबर पासून देशाच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी उत्तरपूर्व म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

  त्यामुळे देशातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. देशात ईशान्य मोसमी वारे म्हणजेच परतीचा मान्सून वाऱ्यांमुळे 26 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून कळवण्यात आलंय.

  दरम्यान याशिवाय ओडिसा आणि गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पूर्व विदर्भात ही परतीच्या मान्सूनचा पाऊस बरसतो त्यामुळे यंदा देखील मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  यंदा देशातील मान्सूनच्या पावसामुळे विविध राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. आता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामूळ शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांना पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये केरळ आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.

  रत्नागिरीत तापमान वाढू लागलं

  कोकणातून काही दिवसांपासून पावसानं माघार घेतलीय. पाऊस परतीच्या प्रवासाला लागलाय पण सध्या रत्नागिरीकर उन्हाच्या झळांनी होरपळून निघतायत. उष्म्याची दिवसें दिवस भर पडतेय. त्यामुळे उन्हाचा दाह वाढताना पहायला मिळतोय. ऑक्टोबर हिट असह्य होवू लागलंय. पाऊस थांबल्यानंतर अचानक उकाडा वाढलाय. सकाळी 30 ते 31 अंशापर्यंत असणारे तापमान दुपारनंतर 35 च्या पुढे जावू लागलंय.आँक्टोबरचा कडाका आता वाढू लागलाय.