एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात येवून बैठक घेऊन दिलासा दिला असता तरी चालले असते : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या वादळ दौ-याची दरेकराकडून खिल्ली

 मुख्यमंत्र्यांचा दौरा (The visit of the Chief Minister) हा कोकणवासीयांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा (dust-up in the eyes of the people of Konkan) आणि दिखाऊपणाचा दौरा होता. विमानतळावर जाऊन बैठक घेणे, पुन्हा मुंबईला येणे एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन कोकणवासीयांना तात्काळ दिलासा दिला असता तरी चालले असते.

  मुंबई (Mumbai).  मुख्यमंत्र्यांचा दौरा (The visit of the Chief Minister) हा कोकणवासीयांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा (dust-up in the eyes of the people of Konkan) आणि दिखाऊपणाचा दौरा होता. विमानतळावर जाऊन बैठक घेणे, पुन्हा मुंबईला येणे एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन कोकणवासीयांना तात्काळ दिलासा दिला असता तरी चालले असते, अश्या शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वादळ दौ-याची खिल्ली उडवली आहे.


   
  आठवडा उलटल्यानंतर कोकणात गेले
  दरेकर यांनी चित्रफित व्टिट करत म्हटले आहे की, या वादळानंतर विरोधी पक्षनेत्यांनी कोकणचा दौरा केला. त्यावेळी महाविकास आघाडीचे मंत्री उदय सामंत, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार या सर्व मंत्र्यांनी पंचनाम्यांबद्दल वक्तव्य केले होते. दोन दिवसांत पंचनामे होतील, असे ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री आठवडा उलटल्यानंतर कोकणात गेले आणि पंचनामे झाल्यानंतर मदत देऊ, असे त्यांनी तिथे सांगितले. मुख्यमंत्री काहीतरी देऊन जातील, अशी आशा कोकणच्या जनतेला होती. मात्र, त्यांनी काहीही ठोस घोषणा केली नाही. अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

  तोंडाला पाने पुसण्याचे काम
  त्यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही दौरा केला तेव्हा पंचनामे पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी व तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले होते. पण ते झालेच नाहीत. कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले,’ अशी टीकाही दरेकर यांनी केली.