टोलनाक्यांवर सेंसर लागले; फास्टॅग असल्याशिवाय टोलनाका क्रॉस करता येणार नाही

मुंबईतील ५ पैकी ५ टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्टॅग लावले गेले आहेत. २६ जानेवारीपासून चार चाकी वाहनांना मुंबईत फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे. यामुळे २६ जानेवारीनंतर फास्टॅग नसेल तर वाहनांना टोला नाका क्रॉस करता येणार नाही.

मुंबई : फास्टॅग असल्याशिवाय वाहनांना टोलनाका क्रॉस करता येणार नाही. वाहनांना फास्टॅग (Fastag) अनिवार्य असल्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. फास्टॅगसाठी २६ जानेवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.

मुंबईतील ५ पैकी ५ टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्टॅग लावले गेले आहेत. २६ जानेवारीपासून चार चाकी वाहनांना मुंबईत फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे. यामुळे २६ जानेवारीनंतर फास्टॅग नसेल तर वाहनांना टोला नाका क्रॉस करता येणार नाही.

देशात गेल्या वर्षभरापासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’ वापर सुरू झाला.

१ जानेवारी २०२१ पासून सर्वत्र फास्टटॅग बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत पून्हा एकदा २६ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.