जयंत पाटील यांनी घेतली रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक

जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक घेत कामाचा आढावा घेतला. दरम्यान मंगळवारी दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी सुद्धा केली. बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

    बीड : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळाला. जयंत पाटील यांनी रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक घेत कामाचा आढावा घेतला. दरम्यान मंगळवारी दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी सुद्धा केली. बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

    कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावा

    राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.

    रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक

    पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक रात्री १०.३० वाजता घेतली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या शिरूर कासार येथील निवासस्थानी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. उशीर झाला म्हणून बीडवरून शिरूर कासार येथे जाणे शक्य नव्हते मात्र कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मंत्री जयंत पाटील शिरूरकासार येथे गेले आणि तद्नंतर रात्री दोन वाजता अहमदनगर जिल्ह्यात आढावा बैठकीला पोचले.