jayant patil

शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

    मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथील इमारतीच्या भूमीपूजन व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

    भाजपाचे दोन बडे नेते शिवसेनेत येण्याची शक्यता

    चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे.